top of page

पुण्यातील रस्त्यावर दोन तरुणांची दहशत! दिसेल त्याच्यावर केले वार; व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसत आहेत. ते समोर दिसेल त्याच्यावर वार करीत आहेत. दहशत माजविणाऱ्या या दोन तरुणांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सांगवी परिसरातील पिंपळे निळखमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रतीक खरात आणि चेतन जावरे अशी दहशत माजवणाऱ्या तरुणांची नावं आहेत.

ree

दारूच्या नशेत असलेले हे तरुण आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यामध्ये गोंधळ घालत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना भर रस्त्यात थांबवून त्यांच्यावर वार करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.या आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यावर जबर वार केल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशत माजविण्याऱ्या या दोन्ही तरुणांवर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा ते कोणत्या गुन्हेगार टोळीशी संबधितही नाहीत. त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आणि दहशत पसरविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page