top of page

पावसामुळे संपूर्ण रस्ताच गेला वाहून; १० गावांचा संपर्क तुटला

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे लवासा सीटीजवळ असणाऱ्या दासवे पडळघर वस्ती येथील दासवे, आडमाळ ते पानशेत, वरसगाव हा संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. रस्ता वाहून गेल्याने जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे.


रस्त्याची दुरुस्ती वेळेत झाली असती तर आज रस्ता वाहून गेला नसता, असे तेथील ग्रामस्थ सांगत आहेत. अनेकदा सांगूनही बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आजही ही घटना घडली आहे, असं ग्रामस्थांच म्हणणं आहे.


 
 
 

Comments


bottom of page