top of page

"बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी" अशी फेसबुक पोस्ट करत प्राध्यापकाची आत्महत्या

पुणे : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुकवर "बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी" अशी पोस्ट लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रफुल्ल दादाजी मेश्राम (रा. कात्रज) असे आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. मागील काही दिवसात प्रफुल्ल हे मानसिक तणावात होते, कोणासोबत बोलत नव्हते. दरम्यान त्यांनी काल दुपारच्या सुमारास “बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी”अशी पोस्ट फेसबुकवर लिहिली आणि विहिरीत उडून मारून आत्महत्या केली.

त्यांची फेसबुक पोस्ट पाहून त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण समोरून काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सर्वांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळाने एका व्यक्तीने पुरंदर येथील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत आत्महत्या केल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांना विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे काढून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांना मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येमागे आणखी काही कारण होते का याबाबत तपास करण्यात येत असल्याचे सासवड पोलिसानी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page