top of page

भयंकर ! आठवीतील मुलीची कोयत्याने वार करून हत्या

पुणे : कबड्डीचा सराव करत असलेल्या आठवीतील मुलीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी शहरातील बिबवेवाडी परिसरात घडली. आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. मुलीची हत्या होत असताना आजूबाजूला छोटी मुलं खेळत होती. या हत्याकांडामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. हृषिकेश भागवत असे आरोपीचे नाव असून त्याच्या सोबत अन्य दोन व्यक्ती होते.

ree

अधिक माहिती अशी, हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. तर हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. संबंधित मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावासाठी बिबवेवाडी परिसरात आली होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. जखमी अवस्थेतील त्या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


 
 
 

Comments


bottom of page