top of page

उत्तर प्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला

एका खुनाच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जमावाने हल्ला केला. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले असून यामध्ये पोलीस जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हल्ल्यानंतरही पोलिसांनी कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ree

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी तडीपार गुंड प्रविण उर्फ पव्या श्रीनिवास महाजन याने पोलीस कर्मचाऱ्यावर वार करून त्याचा खून केला होता. या खूनाच्या घटनेवेळी त्याची साथीदार महिला उपस्थित असल्याचे समोर आले होते. त्यानुसार तिचा शोध घेतला जात होता. ही महिला गाझियाबाद येथे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व इतर चार जणांचे पथक गाझियाबाद येथे गेले होते. त्यानुसार स्थानिक पोलिसांची मदत घेत पुणे पोलीस महिलेचा शोध घेत असताना साध्या वेशात असलेल्या पोलिसांना नागरिक समजून जमावाने हल्ला केला. तसेच पोलिसांच्या दोन खासगी गाड्यांचीही तोडफोड केली. तसेच, यामध्ये पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. या नंतर देखील पुणे पोलिसांच्या पथकाने त्या महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले आहे. स्थानिक मीडियाने ट्विट केल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page