top of page

वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे पोलीस उपनिरीक्षकाला पडले महागात; केली मोठी कारवाई

परभणी : येथील पाथरी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठल गंगलवाड यांना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे चांगलचं महागात पडलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याने अमोल गंगलवाड यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांना ३ एप्रिल रोजी सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील यात्रा बंदोबस्तासाठी जाण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. मात्र, अमोल गंगलवाड यांनी बंदोबस्त कामी न जाता छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करून आदेशाचे पालन केले नाही. तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. याबाबत त्यांची विभागीय चौकशी केल्यानंतर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांना शासकीय सेवेतून निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत. गजानन पोलीस उपनिरीक्षक गंगलवाड या यांना शासकीय सेवेतून निलंबित केल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.



 
 
 

Comments


bottom of page