top of page

परमबीर सिंह यांना सीआयडीकडून समन्स; सोमवार, मंगळवार दोन दिवस होणार चौकशी

सीआयडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन समन्स पाठवण्यात आली आहेत. एक समन्स मरीन ड्राईव्ह येथे श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आहे, तर दुसरा ठाण्यातील खंडणी प्रकरणी आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांची मरीन ड्राईव्हला दाखल गुन्ह्याप्रकरणी सोमवारी (२९ नोव्हेंबर) चौकशी होईल, तर ठाण्यातील खंडणी प्रकरणी मंगळवारी (३० नोव्हेंबर) चौकशी होणार आहे.

सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस चौकशी होणार असल्याने परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.


Kommentarer


bottom of page