top of page

परमबीर सिंह यांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा

अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिलं. दरम्यान परमबीर सिंह यांच्या वकिलांनी चौकशी आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंबंधी आरोपांवर मोठा खुलासा केला आहे.

ree

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपये वसुलीचे केलेले आरोप ऐकीव माहितीवर असल्याचं त्यांच्या वकिलांनी तपास आयोगाला सांगितलं आहे. तसंच यामुळे परमबीर सिंह यांना साक्षीदार म्हणून उभं करण्यात काही अर्थ नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

ree

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत केली होती. निवृत्ती न्यायाधीश के यू चांदीवाल या समितीत आहेत. वकील अभिनव चंद्रचूड परमबीर सिंह यांची बाजू मांडत असून त्यांनी या समितीसमोर ही माहिती दिली.



 
 
 

Comments


bottom of page