top of page

प्रियांकाच्या ‘त्या’ निर्णयानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच घडामोडी चाहत्यांना समजतात. सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांचे बारीक लक्ष असते, त्यामुळे ती पोस्ट व्हायरल होते. आणि चर्चेत हे येते. अशाच एका पोस्टमुळे प्रियांका आणि निक जोनास यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ree

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन सासरचे आडनाव 'जोनास' हे नाव वगळले असून आता केवळ प्रियांका एवढंच नाव ठेवलं आहे. मात्र प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये केलेल्या या छोटाशा बदलामुळं प्रियांका आणि निक यांच्यामध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रियांका आणि निकमध्ये काही वाद झालाय का? प्रियांका वेगळं होण्याचा निर्णय तर घेत नाही ना?, असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. यावर आता प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.




प्रियांका आणि निक जोनासचं २०१८ साली मोठ्या थाटामाटात राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालं होतं. तेव्हापासून हे दोघे एकत्रच राहतात. याच वर्षी प्रियांका आणि निकने त्यांच्या नवीन घरामध्ये दिवाळी साजरी केली. दरम्यान सोमवारी रात्री अचानक प्रियांकाने जोनास हे अडनाव वगळण्यामागील कारणांबद्दल कोणताही खुलासा केलेला नसला तरी तिच्या आईने यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मधू चोप्रा यांनी प्रियांकाच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे अशा अफवा पसरवू नका अशीही विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली.


 
 
 

Comments


bottom of page