top of page

नरेंद्र मोदींना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचा उल्लेख करतात. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं मोदींचे सख्खे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी एका कार्यक्रमात म्हटलं. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी प्रल्हाद मोदी हे उल्हासनगरला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असं प्रल्हाद मोदी यावेळी म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page