top of page

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घऱी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला आहे, सकाळी सहा वाजता एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

ree

अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु आहे. प्रदीप शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.


 
 
 

Comments


bottom of page