top of page

अभिनेत्री पूनमला पांडेला मारहाण

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिला तिचा पती सॅम बॉम्बे याने मारहाण केली. याप्रकरणी पूनमने पतीवर मारहाणीचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी सॅमला अटक करण्यात आली आहे. सॅम बॉम्बेवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पूनमच्या डोक्याला, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ree

यापूर्वीही पूनम पांडेने सॅम बॉम्बेवर मारहाणीचा आरोप केला होता. पूनम आणि सॅमचे सप्टेंबर २०२० मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी पूनमने सॅमवर शारीरिक छळ, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले. तिने गोव्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली पण दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला होता.


 
 
 

Comments


bottom of page