top of page

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी उमेश नाईक यांनी शुक्रवारी (दि. ७) नागचौक येथे असलेल्या जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उमेश नाईक आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. पंचवटी पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

ree

उमेश नाईक काळाराम परिसरात राहत होते. नागचौक येथील जुन्या घराला रंगकाम करायचे असल्याने तिकडे चाललो असल्याचे पत्नीला सांगून उमेश नाईक सकाळी घरातून बाहेर पडले होते. बराच वेळ घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना फोन केला. मात्र, उमेश नाईक यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने काहीजण त्यांना शोधण्यासाठी जुन्या घरी गेले. त्याठिकाणी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. अखेर घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा स्लॅबच्या गजाला लटकून उमेश नाईक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली. नाईक यांनी आत्महत्या का केली याचे कारण शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 
 
 

Comments


bottom of page