top of page

पुन्हा एकदा शताब्दी एक्सप्रेसमध्ये आग (Video पहा)

नवी दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका बोगीला आज पहाटे अचानक आग लागली. आगीचे वृत्त समजताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं या अपघातातकोणालाही इजा झालेली नाही.

ree

आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या अगोदर १३ मार्च रोजी दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या सी - ५ कोच या बोगीला आग लागली होती.

नवी दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस सकाळी ६.४५ वाजल्याच्या सुमारास ही रेल्वे गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. तेव्हा या गाडीच्या पार्सल कोचमध्ये अचानक आग लागली. कोचला आग लागल्याची माहिती मिळाताच रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी थोड्याच वेळात या आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे शताब्दी एक्सप्रेसला गाझियाबाद स्थानकात सुमारे 1 तास 35 मिनिटे उभे राहावे लागले, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या डब्यांना हटवून रेल्वेला पुढच्या प्रवासासाठी जवळपास ८.२० मिनिटांनी रवाना करण्यात आलं.




 
 
 

Comments


bottom of page