top of page

प्रियांका गांधींचे ‘हे’ फोटो पाहिलेत का ?

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत.

त्यांनी मंगळवारी सधारु टी स्टेट येथे चहाच्या मळ्यातील कामगारांशी संवाद साधला.

यावेळी प्रियांका गांधी यांनी महिला कर्मचाऱ्यांसोबत पारंपारिक पद्धतीने चहाची पाने खुडली.

चहाचा मळा आणि कामगार हे कायमच आसाममधील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियांका गांधी यांनी सोमवारी कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आसामच्या दौऱ्याला सुरुवात केली होती.

कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रियांका गांधी लखीमपूरला रवाना झाल्या होत्या. लखीमपूर भागात प्रियांका गांधी यांनी झुमर या पारंपारिक नृत्याचा आनंदही लुटला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आसाम विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आसाममध्ये विधानसभेच्या 126 मतदारसंघांमध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर मतदानाचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.



Comments


bottom of page