top of page

"चिट्टी नी नावंटे ... " कव्हर साँग पाहिलं का?

सोलापुरातील गौरी फिल्म आणि महालक्ष्मी प्रोडक्शनने नुकतेच तेलगू चित्रपट सृष्टीत गाजलेल्या " जथी रत्नालू" या चित्रपटातील "चिट्टी नी नावंटे ... " हे कव्हर साँग प्रदर्शित केले आहे. या कव्हर साँगमध्ये रामेश्वर उदगिरी, शिवानी दंडी या सोलापूरच्या युवा कलाकारांनी उत्कृष्ठ अभिनय केला असून याचे शुटिंग सोलापूर आणि हैदराबाद येथे करण्यात आले आहे

ree

हैदराबाद येथील चार मिनार, कृष्णानगर, आमीर पेठ अन्नपूर्ण स्टुडिओ, लुंबिनी पार्क येथे तसेच सोलापुरातील हरी पदम या अपार्टमेंटमध्ये देखील शूटिंग करण्यात आले आहे. श्रीकांत संभारंभ यांनी दिग्दर्शन केले असून साई दासी हे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. डी. ओ. पी. शुभम गुंडला, लक्ष्मीकांत गड्डम, कला दिग्दर्शन वेणुगोपाल गल्पल्ली, नरेश गाजुल, प्रशांत गाजुल, तसेच पोस्टर डिझाईन अजित दोंता यांनी केले.


तांत्रिक बाबी लक्ष्मण गुंडला, राजेश दोरनाल, पवन वडनाल यांनी पाहिले. या कवर सोंग करीता महालक्ष्मी प्रॉडक्शनच्या ज्योती संतोष उदगिरी यांनी प्रोडक्शन खर्च उचलला तर संतोष रामचंद्र उदगिरी, लक्ष्मीकांत रामचन्द्र उदगिरी, श्रीनिवास रामचन्द्र उदगिरी, सतिश दंडी यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे श्रीकांत संभारम यांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page