top of page

९ एप्रिलपासून आयपीएलचा थरार!

रविवारी विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ ( IPL2021) चे वेळापत्रक आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने जाहीर केले. दोन वर्षानंतर आयपीएलचे सामने भारतात होणार असून अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत.

ree

आयपीएल २०२१ चा शुभारंभ ९ एप्रिल २०२१ रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने चेन्नई येथे होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसेच ३० मे २०२१ रोजी अंतिम फेरीचा सामना होणार आहे.



प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. ५६ लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने खेळले जातील. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही.




 
 
 

Comments


bottom of page