top of page

हॉस्पिटलला भीषण आग: दोघांचा मृत्यू; ७०रुग्णांची सुटका

मुंबईतील भांडुप येथे असलेल्या 'ड्रीम्स मॉल'मधील सनराइज हॉस्पिटलला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे असून जवळपास ७० रुग्णांची सुटका करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.

ree

अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. ७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.


“ मॉलमध्ये हॉस्पिटल पहिल्यांदाच पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.  ७० रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात  आलं असून आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 


 
 
 

Comments


bottom of page