top of page

Video व्हायरल; विमानाची शिडी चढताना तीनवेळा पडले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा शुक्रवारी अटलांटाच्या दौरा होता. अटलांटाला जाण्यासाठी ते राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या "एअरफोर्स वन" या विमानाची शिडी चढत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते पायऱ्यांवरच पडले, असं एकदा नाही तर दोन वेळेस ते पडले. दोन्ही वेळेस त्यांनी हाताचा आधार घेत स्वतःला सावरलं, पण तिसऱ्यांदा ते गुडघ्यावर पडले. तिसऱ्यांदा पडल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला सावरलं. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यानंतर दोन्ही हातांनी साइड रेलिंगचा आधार घेत ते विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅल्यूट ठोकून ते विमानात बसण्यासाठी निघून गेले.

दरम्यान, तीन वेळेस पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बायडेन यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, त्यावर व्हाइट हाउसने बायडेन पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगितलं आहे.

 
 
 

Comments


bottom of page