top of page

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलवली तातडीची बैठक

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची चिन्हं दिसत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ( ओमीक्रोन ) ने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. B.1.1.529 ( ओमीक्रोन ) हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तिमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलवली आहे.

या बैठकीत संबंधित केंद्रीय मंत्री, केंद्र सरकारचे अधिकारी आणि निवडक डॉक्टर सहभागी होणार आहेत. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती, करोनाचा नवा विषाणू B.1.1.529 चा संभाव्य धोका आणि यामुळे करायच्या उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. तेव्हा या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
 
 

Comments


bottom of page