top of page

पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. काँग्रेस भवन येथे आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

ree

आगामी महापालिका निवडणुकासाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली होती. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणीमुळे येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. त्याबरोबर निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


 
 
 

Comments


bottom of page