top of page

ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला राज्यात चक्का जाम...

मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी "सरकारमध्ये मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज काय?", असा सवाल करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ree

तसेच २६ जून रोजी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मंत्र्यांना भरपूर अधिकार असतात. सरकारला भरपूर अधिकार असतात. त्यावेळी आमच्याकडे निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेत आरक्षण. टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पावलं टाकली. अध्यादेश काढले. या सरकारची मानसिकता तशी नाही. त्यामुळे तो अध्यादेश बाद झाला. राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं आहे. त्यामुळे आता मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची काय गरज आहे? त्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. न्यायालयातही जाऊ,” असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.


 
 
 

Comments


bottom of page