top of page

प्रसिध कृष्णाचा पहिल्याच सामन्यात विक्रम

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज (दि. २३ ) खेळवण्यात आला. आपला पहिलाच सामना खेळणारा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने चार बळी घेत एक विक्रम रचला आहे. पदार्पणाच्या सामन्यात आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला चार बळी मिळवता आले नव्हते. त्यामुळे आता हा विक्रम प्रसिधच्या नावावर जमा झाला आहे.

प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडत तीन विकेट्स पटकावले. त्यानंतर अखेरच्या फलंदाजालाही बाद करत प्रसिधने यावेळी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि सामन्यात सर्वाधिक विकेट्सही मिळवले.


 
 
 

Comments


bottom of page