top of page

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

पिंपरी-चिंचवडमधील काटेपुरम चौक येथे भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन ते तीन जणांनी योगेश जगतापवर गोळ्या झाडल्या. यामध्ये तो जखमी झाला. उपचारा दरम्यान योगेश जगतापचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ree

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास योगेश जगताप हे काटे पुरम चौकात असताना अचानक त्यांच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. त्यानंतर जगताप पळत सुटले, आरोपीने जगताप यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून पैकी दोन त्यांना लागल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जगताप यांचा मृत्यू झाला आहे.गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. ही माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page