top of page

“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर सामूहिक फोटो काढताना अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत महापौर व आयुक्त यांनी दिलगिरी व्यक्त करीत, मास्क न घालता कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार ५०० रुपये दंड स्वतःहुन भरला तसेच सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.


मंगळवार, दि. १८ मे रोजी दुपारी पाच वाजता चंद्रपूर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटन झाले. याप्रसंगी मनपा पदाधिकारी, अधिकारी आणि आरोग्य चमूसह सामूहिक फोटो काढण्यात आले. अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाले. ही बाब नंतर लक्षात येताच महापौर व आयुक्त स्वतःहुन दंड भरला . अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करीत नियमानुसार दंड भरला आहे.


 
 
 

Comments


bottom of page