top of page

औषध कंपनीला आग; ६ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील एका औषध कंपनीत आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली मृतांपैकी चार जण बिहारमधील स्थलांतरीत कामगार होते. वायू गळतीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच प्रत्येक गंभीर कामगाराला ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page