top of page

अरूण गवळी यांच्या भावाचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतरही शिवसेनेतलं इनकमिंग वाढलं आहे. अरूण गवळींचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

ree

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना या पक्षप्रवेशाचा मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे


मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page