top of page

पवार, फडणवीस आणि अमित शाह यांचा फोटो व्हायरल होताच राष्ट्रवादीनं दिलं प्रत्युत्तर; वाचा...

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार लवकरच पडेल आणि भाजपाचं सरकार स्थापन होईल, अशी राजकीय भविष्यवाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शरद पवार, फडणवीस आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला. याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. “अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर खात्याने असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.” असं ट्विट मध्ये म्हंटलं आहे.



 
 
 

Comments


bottom of page