top of page

आंबेडकर जयंतीनिमित्त ‘या’ शहरात १ रुपये लीटर दराने पेट्रोल, पंपावर तुफान गर्दी

दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असताना सोलापुरातील नागरिकांना आज दिलासा मिळाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंती निमित्त सोलापुरातील नागरिकांना आज दिवसभर एका रुपयात एक लीटर दराने पेट्रोल वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक राहुल सर्वगोड यांनी दिली. .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळ पासूनच पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचे दिसून आले.

आज पेट्रोलचे दर १२० रुपयांपर्यंत गेलेत. मोदी सरकारचा निषेध आणि बाबासाहेब जंयतीनिमित्त आम्ही 'एका रुपयात एक लीटर पेट्रोल' हा छोटासा उपक्रम राबवत आहोत, सोलापूरकरांना आज दिवसभर या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आयोजक राहुल सर्वगोड यांनी दिली. आहे.

प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या धोरणानुसार पहिल्या ५०० लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. एक रुपये लिटर दराने पेट्रोल भरुन घेण्यासाठी अनेकांनी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं.




 
 
 

Comments


bottom of page