top of page

पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ?

एकीकडे राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले असताना पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांची यांच्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत "पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ? " असा सवाल केला आहे.

ree

"एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब कोरोनाचे नियम पाळा म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात कोरोना नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब ? पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ? करणार नसाल तर आजपासून महाराष्ट्रातील कुणावरही नियम मोडल्याबद्दल सरकारला गुन्हा दाखल करता येणार नाही. असं ट्विट करत दरेकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.


 
 
 

Comments


bottom of page