top of page

मुख्यमंत्र्यांचा, केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम'

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी कऱण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत केली आहे.

ree

'कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!

विरोधी पक्ष नेते...'तीन दिवस'

मुख्यमंत्री...'तीन तास'

विरोधी पक्ष नेते, कोकणवासीयांच्या बांधावर, उंबरठ्यावर जाऊन विचारपूस,

मुख्यमंत्र्यांचा, केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम' असं ट्विट मध्ये म्हंटलं आहे.


दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page