top of page

... अजून किती बळी घेणार आहात?

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

ree

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यावेळी रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी "निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?" असा सवाल केला आहे.


"निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले” असं प्रवीण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.



 
 
 

Comments


bottom of page