top of page

पंडित बिरजू महाराज यांचे निधन

प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाची माहिती पंडित बिरजू महाराज यांचे नातू स्वारांश मिश्रा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

ree

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. ​दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

लखनऊ घराण्याचे असलेल्या बिरजू महाराज यांचं आधीचं नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असं होतं. कथ्थकसह ते शास्त्रीय गायनसुद्धा करत होते. बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्काराने गौरवलं होतं. पद्म पुरस्काराशिवाय बिरजू महाराज यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. बिरजू महाराज यांना काशी हिंदू विद्यापीठ आणि खैरागढ विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी दिली होती.



 
 
 

Comments


bottom of page