top of page

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला स्पष्ट बहुमत

पश्चिम बंगालमधील २९२ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार तृणमूल काँग्रेसने २०४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. हा कल पाहता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनतेनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर सुरुवातीपासूनच भाजपाने मोठं आव्हान निर्माण केलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला होता.


पक्ष आणि आघाडी खालील प्रमाणे...

तृणमूल काँग्रेस - २०७

भाजप - ८२

इतर - ३


 
 
 

Comments


bottom of page