top of page

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरता वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परमबीर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ree

ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. परमबीर यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी (ऑनलाइन तक्रार) कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण २७ जणांचा समावेश आहे.


या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page