top of page

सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे.

महाराष्ट्र सरकारला हा मोठा दिलासा मानला जात आहे. इतके वर्ष महाराष्ट्र पोलिसांत होता तरी त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही का असा सवाल करत परमबीर सिंह यांना फटकारत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर आम्ही स्थगिती द्यावी का? आम्ही सर्व एफआयरबद्दल बोलत नाही. एफआयरासाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत, असं म्हटलं.


 
 
 

Comments


bottom of page