top of page

३१ मार्च नाही आता ३० जूनपर्यंत करता येणार पॅनकार्ड -आधारकार्ड लिंक

३१ मार्च ही पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातल्या अनेक नागरिकांना हे करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. केंद्र सरकारने अखेर आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत वाढविली आहे. त्यामुळे ज्यांना आज पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करता आलेले नाही, त्यांना ३० जूनपर्यंत ते लिंक करता येणार आहे.

कोरोना काळात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोविड-१९च्या काळात काही भागांमध्ये लॉकडाऊन तर काही भागांमध्ये कठोर निर्बंध घालून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात येत असल्याचं आयकर विभागाकडून ट्वीट करून जाहीर करण्यात आलं आहे.

ree

दरम्यान, पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी बुधवारी (३१ मार्च ) शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. अनेक व्यक्तींनी एकाच वेळी वेबसाईटला भेट दिल्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी ट्वीटरवर नाराजी व्यक्त करत आपल्या अडचणी देखील शेअर केल्या.दरम्यान, आता ही मुदत वाढवून दिल्यामुळे ज्यांचं लिंकिंग आज होऊ शकलं नाही, त्यांना दिलासा मिळाला आहे.


 
 
 

Comments


bottom of page