top of page

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या फरार आरोपीला अखेर अटक

पुणे : सराईत गुंड माधव वाघाटे याच्या हत्येनंतर अंत्यविधीत शेकडो बाईक्सची रॅली काढल्याप्रकरणी फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्यात 21 वर्षीय गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. आरोपी सिद्धार्थ संजय पलंगे गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता.

ree

माधव वाघाटे याच्या हत्येनंतर अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले होते. परंतु गुलमोहर सोसायटी, बालाजीनगर भागात राहणारा 21 वर्षीय सिद्धार्थ पलंगे मागील दोन महिन्यांपासून फरार होता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. पलंगे याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, मारामारी असे तीन गुन्हे सहकारनगर, दत्तवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

काय आहे प्रकरण ?

पुण्यातील सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याची 15 मे रोजी हत्या झाली होती. वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन करून धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. यासंबंधी व्हिडीओ समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


 
 
 

Comments


bottom of page