top of page

मोठी कारवाई : भारतीय हद्दीत घुसखोरी करणारी पाकिस्तानी बोट पकडली

भारतीय हद्दीत घुसखोरी करणारी पाकिस्तानी बोट पकडण्यात भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानी बोट भारतीय पाण्यात सहा ते सात मैल आत घुसली होती. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘अंकित’ला पाहताच पाकिस्तानी बोट ‘यासिन’ पळ काढू लागली होती, मात्र त्यानंतर तटरक्षक दलाने कारवाई करत बोट पकडली.

ree

बोटीतून आतापर्यंत दोन टन मासे आणि ६०० लिटर इंधन जप्त करण्यात आले आहे. या बोटीत चालक दलासह १० पाकिस्तानी होते. पोरबंदरला पोहोचल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल, असे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page