top of page

असदुद्दीन ओवेसींच्या निवासस्थानाची तोडफोड; पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात

अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या २४-अशोक रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानी निदर्शने केली आणि तोडफोड केली. ओवेसी यांच्या घराबाहेरील नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे.


 
 
 

Comments


bottom of page