top of page

Video : कांदा उत्पादकांसाठी खुशखबर ! नाफेडकडून कांदा खरेदी सुरु – मुख्यमंत्री

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ree

मुंबई : कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.

राज्यभरात कांद्याचे भाव अवघ्या 2 ते 3 रुपये किलोंवर आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचे पडसाद आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. कांद्याचे दर वाढावेत म्हणून राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


Comments


bottom of page