top of page

आपल्या जिल्ह्यांमधले निर्बंध, त्यांची वर्गवारी, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर!

राज्यात काही दिवसांपूर्वी लावलेले लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यांची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी केली आहे. यानुसार प्रत्येक गटातल्या जिल्ह्यांमध्ये वेगळे निर्बंध आहेत. या सगळ्याची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर मिळणार आहे.

ree

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने https://msdmacov19.mahait.org/ हे संकेतस्थळ सुरु केले असून असून या संकेतस्थळावर नागरिकांना कोरोनासंदर्भात राज्य तसंच स्थानिक प्रशासनाने लागू केलेले निर्बंध या सगळ्याविषयीची माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे.

https://msdmacov19.mahait.org/ या संकेतस्थळावर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची वर्गवारी दिलेली आहे. कोणत्या लेव्हलमध्ये कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कोणते निर्बंध लावले आहेत, याबद्दलची माहिती या साईटवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन बेड्सची संख्या, आठवड्याभरातली ऑक्सिजनची स्थिती याबद्दलही माहिती मिळते.

 
 
 

Comments


bottom of page