top of page

... दोघांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत ...

नवजोत सिंग सिद्धू यांनी थेट राज्याचे महाधिवक्ता एपीएस देओल आणि पोलीस महासंचालक सहोटा यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत या दोघांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार नसल्याचा अल्टिमेटम सिद्धू यांनी पंजाब राज्य सरकारला दिला आहे.

ree

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे नवजोत सिंग यांनी गेल्या महिन्यात पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बऱ्याच मनधरणीनंतर आणि पक्षश्रेष्ठींनी दोघांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर मतभेद मिटले. दोनच दिवसांपूर्वी नवजोतसिंग सिद्धू यांनी राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र, महाधिवक्ता एपीएस देओल आणि पंजाबचे पोलीस महासंचालक सोहोटा यांना पदावरून हटवण्यात येत नाही, तोपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार नाही, असा अल्टिमेटम सिद्धूंनी दिला आहे. त्यांचं पत्र मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे पोहोचलं असून त्यावर मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवजोतसिंग सिद्धू आणि देओल, सोहोटा यांच्यातल्या वादामुळे पुन्हा एकदा सिद्धू विरुद्ध पंजाब सरकार असा वाद उभा राहिला आहे. त्यात राज्याचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी जाहीररीत्या सिद्धूंवर परखड शब्दांमध्ये टीका केल्यामुळे हा वाद देखील थोडक्यात मिटणार नाही, हेच स्पष्ट झालं आहे.



 
 
 

Comments


bottom of page