top of page

नवनीत राणांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्या असून, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नवनीत राणा यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर नागपूरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. पण ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असे माझे मत आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


 
 
 

Comments


bottom of page