top of page

नारायण राणेंची आज पोलिसांसमोर हजेरी; अलिबागमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवला

रायगडः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. महाड न्यायदंडधिकाऱ्यांनी राणेंना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना ३० ऑगस्टला अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे नारायण राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ree

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर राणेंना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार राणेंवर कारवाई करण्यात आली होती. महाड न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणेंना अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. नारायण राणे यांना कोर्टानं ३० तारखेला एनसीपीकडे हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज नारायण राणे अलिबाग पोलिस स्टेशनला एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. राणे अलिबागला येणार असल्यामुळं परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोर्टानं राणेंना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page