top of page

जेवणात मटण नसल्याने भर मांडवात लग्न मोडलं

लग्नात जेवणात केवळ मटण नाही या गोष्टीचा राग आल्यामुळे केनझार जिल्ह्यातील रेबानापालास्पाळ येथील रमाकांत पात्रा या तरुणाने भर मांडवात लग्न मोडलं. आणि त्याच दिवशी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केल्याचं समोर आलं. ओडिसामधील बांधागाव येथे एका लग्नात हा प्रकार घडला आहे.

ree

लग्नाची धामधूम सुरु असतानाच मुलीकडच्यांनी मोठ्या थाटात वऱ्हाड्यांचं स्वागत केलं. यात लग्नाचे विधी सुरु असतानाच जेवणात मटण नसल्याचं वऱ्हाड्यांच्या लक्षात आल्यानं मुलाकडच्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे लग्न ठरवतानाच लग्नात मटणाचं जेवण हवं असं सांगितलं होतं. तरीदेखील जेवणाची नीट व्यवस्था न केल्यामुळे नवरदेवाच्या रागाचा पारा चढला.

लग्नात मटण नसल्यामुळे मुलीकडच्यांनी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांना पुरेपूर समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी जराही ऐकून घेतलं नाही आणि लग्न मोडलं.


 
 
 

Comments


bottom of page