top of page

‘या’ जिल्ह्यात ज्यांनी लस घेतली त्यांनाच मिळणार दारू

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असून देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र बरेच लोकं लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे म्हणून एक नियम केला आहे. त्यांच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील दारूच्या दुकानासमोर ‘ज्यांनी लस घेतली त्यांनाच दारू मिळेल’, अशी नोटीस लावण्यात आली आहे.

ree

हेम कुमार सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली. दरम्यान, हेम कुमार सिंग यांनी दारू दुकानांना स्पष्टपणे ‘ज्यांनी लस घेतली त्यांनाच दारू मिळेल’ अशी नोटीस लावण्याच्या सूचना दिल्या. सैफई येथील मद्य दुकानांच्या कर्मचाऱ्यांनीही याची पुष्टी दिली असून ग्राहकांचे कोव्हीड लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासल्यानंतरच आम्ही दारूची विक्री करत असल्याचे सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page