top of page

लस घेण्यास नकार; २७ जणांना कामावरुन काढले

कोरोनाच्या Omicron व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सध्या लस हा एकमेव उपाय आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र काहीजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अमेरिकेच्या हवाईदलातील २७ जणांनी लसीकरण करण्यास नकार दिल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ree

अमेरिकन संरक्षण विभागाचे कार्यालय पेंटागॉनने या वर्षी ऑगस्टमध्ये सर्व सैनिकांसाठी लस अनिवार्य केली. हवाईदलातील २७ सैनिकांनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला. सैनिकांना ते लस घेण्यास का नकार देत आहेत हे स्पष्ट करण्याची संधीही देण्यात आली आहे. मात्र त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

आतापर्यंत ९७ टक्के सैनिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही टक्केवारी अमेरिकेच्या लोकसंख्येच्या लसीकरणापेक्षा जास्त आहे. सध्या अमेरिकेच्या हवाई दल आणि अंतराळ दलात सुमारे ३ लाख २६ हजार सैनिक कार्यरत आहेत. त्याच वेळी, विविध सैन्यात तैनात असलेल्या ७९ अमेरिकन सैनिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.




 
 
 

Comments


bottom of page