top of page

महाबळेश्वरमध्ये वाघ नाहीत! ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर वनविभागाचे स्पष्टीकरण

“महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा तो व्हायरल व्हीडीओ महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील नसल्याचे महाबळेश्वर वनविभागाने म्हटले आहे. हा व्हिडीओ आपल्याकडील नसून, विदर्भाकडील किंवा माळशेज घाटाकडील असू शकतो. महाबळेश्वर परिसरामध्ये वाघ असणे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब असेल, मात्र महाबळेश्वर परिसरामध्ये वाघ नाहीत, बिबटे आहेत.

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी रविवारी सायंकाळी एक व्हिडीओ पोस्ट केला होता, मात्र हा व्हिडीओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जुना व्हिडीओ असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.



Comments


bottom of page