top of page

परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार

अकोला: शहरातील तीन खासगी रुग्णालयात विना परवानगी व नियमांचे उल्लंघन करून कोरोना रुग्‍णांवर उपचार करण्यात येत असल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची गंभीर दाखल घेत महापालिका आयुक्तांनी या तिन्ही रुग्णालयांना मिळून १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ree

जिल्‍हास्‍तरीय सुकाणु समितीने राम नगर येथील डॉ. नरेंद्र सरोदे यांच्या श्वास हॉस्‍पिटलमध्ये तपासणी केली. अस्‍थिरोग निदानाचं रुग्‍णालय असूनही येथे बेकायदेशीररित्या सात कोरोना संशयित रुग्‍णांना भरती केले गेले होते. नियमांचे उल्‍लंघन करून या रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्‍शनही सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी आढळून आला. त्यामुळं या रुग्णालयाला दोन लाखांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे.

कौलखेड येथील डॉ. स्‍वप्‍नील प्रकाशराव देशमुख यांच्या फिनिक्‍स हॉस्‍पिटलमध्येही ९ कोरोना रुग्‍णांना भरती करून रुग्‍णांच्‍या संमतीपत्राविना नियमांचे उल्‍लंघन करत त्यांना रेमडेसिविर दिले जात असल्‍याचे आढळून आले. या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नुसार ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच महाजनी प्‍लॉट येथील डॉ. सागर थोटे यांच्या थोटे हॉस्‍पीटल व चेस्‍ट क्लिनिकमध्ये देखील बेकायदा कोरोना केअर सेंटर सुरू करून १३ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना रेमडेसिविरचे इंजेक्‍शन दिले जात असल्याचेही आढळून आले. या रुग्णालयाला तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 
 
 

Comments


bottom of page